गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (16:29 IST)

तेंडुलकर- कांबळी यांच्यात सगळ आलबेल

sachin tendulkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यात आठ वर्षांनी पुन्हा एकदा मैत्री झाली आहे. “आमच्यात आता सगळं आलबेल आहे. त्यामुळे मी फारच खूश आहे. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि बोललो,” असं कांबळीने सांगितलं आहे.“जे काही घडलं ते आमच्यात होतं. आता मी आमच्या मैत्रीसाठी अतिशय आनंदी आहे.”

मुंबईत सोमवारी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रसी XI : द ग्रेट इंडियन क्रिकेट स्टोरी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने केवळ एकमेकांना मिठीच मारली नाही तर बातचीतही केली.

याआधी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी सचिनने मला मदत केली नाही,” असा आरोप विनोद कांबळीने जुलै 2009 मध्ये एका टीव्ही शोमध्ये केला होता. त्यानंतर या मित्रांमध्ये दुरावा आला होता.