रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (12:42 IST)

एसटी कर्मचाऱ्याचा संप मागे

एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदा ठरवला आहे. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी हा संप मागे घेत असल्याचं परिपत्रक एसटी संघटनेने प्रसिद्ध केलं.

कोर्टाच्या आदेशानंतर कर्मचारी संघटनांनी संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी  रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. कोर्टाच्या आदेशाचं पालन करुन, संप मागे घेण्याचा निर्णय या बैठकीत  झाला.

न दिवाळीत एसटी कमागार संघटनेनं पुकारलेल्या संप हा बेकायदेशीर असून, संपावर गेलेल्या कर्माचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावं. अन्यथा न्यायालयाचा अवमान प्रमाणे कारावई करण्यात यावी असे आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाने देऊन भाऊबीजेच्या पूर्वसंधेला एसटीने प्रवास करणाऱ्यांना दिलासा दिला आहे.

उच्चस्तरीय समितीने 15 नोव्हेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करावं, असा आदेशही मुंबई हायकोर्टाने दिला. तर अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 21 डिसेंबरची मुदत कोर्टाकडून देण्यात आली आहे.