1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:23 IST)

रेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी सचिनकडून दोन कोटी

sachin tendulkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पश्चिम आणि मध्ये रेल्वेवर पुलांच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. खासदार निधितून सचिनने ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सचिनने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून पुलांच्या दुरुस्तीसाठी खासदार निधितून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यामुळे आता सचिनच्या खासदार निधीतून पश्चिम आणि मध्य रेल्वेला अनुक्रमे एक-एक कोटी रुपये मिळणार आहेत.