Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

विजेंदरच्या प्रश्नाला राहुल गांधींचे उत्तर

rahul gandhi
नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (11:25 IST)
सध्या गुजरातच्या राजकीय आखाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दोन हात करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मार्शल आर्ट्समध्येही पारंगत आहेत. आईकिदो नावाच्या जपानी खेळात राहुल गांधींनी ब्लॅक बेल्ट पटकावल आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंगने राजकीय नेते खेळांमध्ये का रस दाखवत नाही? असा सवाल विचारला, यावर उत्तर देताना राहुल गांधींनी एक गुपित उघड केलं.
जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या आईकिदो नावाच्या खेळात ब्लॅक बेल्ट मिळवल्याचे राहुल गांधींनी सांगितले. मी जाहीररित्या कुठल्याही खेळाबद्दल बोलत नसलो, तरी क्रीडा हा माझ्या आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे, असे राहुल गांधी म्हणाले. विजेंदर सिंग फक्त राहल गांधींच्या खेळाच्या आवडी-निवडी विचारुन थांबला नाही. संपूर्ण देशाला सतावणारा प्रश्न राहुल गांधींना विचारण्याचे धाडसही त्याने दाखवले.
‘मी आणि माझी बायको नेहमी म्हणतो की राहुल भैया कधी लग्न करणार? तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर लग्न करण्याची मजाच वेगळी असेल’, असं विजेंदर म्हणाला. या प्रश्नाला मात्र राहुल यांनी बगल दिली. ‘हा खूप जुना प्रश्न आहे. मी नशिबावर विश्वास ठेवतो. जेव्हा होईल तेव्हा होईल.’ असे राहुल गांधी म्हणाले.


यावर अधिक वाचा :