शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी, संजय पांडे यांचा टोला

shivsena
Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (16:08 IST)
शिवसेना टिपू सुलतानची जयंती साजरी करणार असल्याचे वृत्त ऐकून मोठा धक्का बसला, असं म्हणत भाजपा प्रदेशचे उत्तर भारतीय मोर्चेचे अध्यक्ष संजय पांडे यांनी शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी असा टोला लगावला आहे.
टिपू सुलतानच्या जयंतीवरुन पांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्या टिपू सुलतानाने असंख्य हिंदू बांधवांचे सक्तीने धर्मांतर केले, अशा क्रूरकर्म्याची जयंती शिवसेना साजरी करणार आहे. सत्ता टिकविण्यासाठी शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला शिवसेना मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांमध्ये पांडे यांनी शिवसेनेवर टीका केलीय.

पांडे यांनी आपली भूमिका जाहीर करणारं एक पत्रकच जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी, टिपू सुलतानाचा इतिहास शिवसेनेला माहीत नसेल असे म्हणता येणार नाही. तरीही शिवसेना टिपूची जयंती साजरी करायला निघाली आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना हिंदुत्वासाठी लढणे शिकवले, त्याच शिवसेनेने टिपू सुलतानची जयंती साजरी करावी यासारखी दुःखदायक गोष्ट नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी प्रसंगी सत्ताही लाथाडली त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला सत्तेसाठी कोणत्या थराला जावे लागते आहे हेच यातून दिसतं आहे, असं म्हटलं आहे. पत्रकाच्या शेवटी, शिवसेनेने एवढ्यावरच थांबू नये, आता शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी, असा खोचक टोलाही पांडे यांनी लगावला आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथे ...

बापरे ! ओडिशाच्या सोनपुरात लग्नाचा आनंद शोकात बदलला

बापरे ! ओडिशाच्या सोनपुरात लग्नाचा आनंद शोकात बदलला
ओडिशाच्या सोनपुरात एक अतिशय वेदनादायक अपघात झाला. लग्नाची संधी होती

मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच झाला, पोलिसांचा प्राथमिक ...

मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच झाला, पोलिसांचा प्राथमिक अहवाल
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या ...

PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ...

PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक ((Cambridge ...

मुलाच्या कमाईवर आई वडिलांचाही समान अधिकार

मुलाच्या कमाईवर आई वडिलांचाही समान अधिकार
नवी दिल्ली- पोटगीप्रकरणी न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय देत म्हटले की की कोणत्याही ...