शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2023 (17:30 IST)

Shree Siddhivinayak Temple: मुकेश अंबानी मुलगा -सून आणि नातवासोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले, पाहा व्हिडिओ

mukesh ambani family
ANI
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा आकाश, सून श्लोका आणि नातू पृथ्वी यांनी बुधवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. हे कुटुंब मंदिराच्या आवारात प्रवेश करताना आणि नंतर प्रार्थना करून निघताना दिसले.
 
फोटोंमध्ये मुकेश अंबानी पृथ्वीला घेऊन जाताना दिसत आहेत. बुधवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या आयपीएल एलिमिनेटर सामन्याच्या काही तास आधी त्याांनी भेट दिली आहे.
 
अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रसूतीपूर्वी तो गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसत होत्या. श्लोकासोबत पती आकाश, सासरे मुकेश अंबानी आणि मुलगा पृथ्वी देखील आशीर्वाद घेताना दिसले. चौघांनीही गणपती बाप्पाच्या दरबारात नतमस्तक होऊन लहानग्या पाहुण्यांच्या सुखासाठी प्रार्थना केली.
  
दरम्यान, मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने नुकतीच जगभरातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. 
Edited by : Smita Joshi