बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 17 मार्च 2021 (08:11 IST)

मोदींचे मुख्य सल्लागार सिन्हा यांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के. सिन्हा यांनी राजीनामा दिला आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे सिन्हा यांनी आपल पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सिन्हा यांना सप्टेंबर 2019 मध्ये पंतप्रधानांच्या मुख्यय सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले होते. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1977 च्या तुकडीचे ते अधिकारी होते. त्यांनी या अगोदर पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी म्हणूनही काम केलेले आहे. 
 
याशिवाय ते ऊर्जा मंत्रालयात सचिवपदी देखील कार्यरत होते. तसेच, त्यांनी चार वर्ष मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही काम केले आहे.
 
सिन्हा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवलेली आहे. तसेच, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून अर्थशास्त्रात पदव्युत्तर परीक्षा देखील पास केलेली आहे. याशिवाय सेवाकाळात त्यांनी लोक प्रशासनात पदव्युत्तर पदविका आणि सामाजिक विज्ञान विषयात ए.फिल देखील पूर्ण केले आहे.