गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (20:52 IST)

मुलाला दंश केल्यावर सापाचा मृत्यू

Snake dies
साहस आणि रहस्यांनी भरलेले हे जग समजून घेणे खूप कठीण आहे. ताजे प्रकरण गोपालगंजचे आहे. जिथे दारात खेळणाऱ्या एका लहान मुलाला विषारी साप चावला, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सापाने मुलाला चावा घेतला, त्यानंतर लगेचच सापाचा मृत्यू झाला. यानंतर हा प्रकार संपूर्ण परिसरात उत्सुकतेचा विषय बनला आहे.
 
बाळ पूर्णपणे निरोगी
कुचायकोट पोलीस स्टेशन हद्दीतील खजुरी गाव येथे हे प्रकरण घडलं आहे. सर्पदंश झाल्याची माहिती नातेवाइकांना समजल्यानंतर तातडीने मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी मुलाला निरोगी असल्याचे सांगितले. बरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माधोपूर गावातील रहिवासी रोहित कुशवाह यांचा 4 वर्षांचा मुलगा अनुज कुमार हा गेल्या दोन महिन्यांपासून आईसोबत कुचायकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खजुरी पूर्व टोला गावात आजोबा मुनिद्र प्रसाद यांच्या घरी गेला होता.
 
मुल घराबाहेर खेळत होतं
बुधवारी सायंकाळी ते घराजवळ खेळत असताना एका विषारी सापाने मुलाला दंश केला. त्यानंतर मुलाने रडत रडत नातेवाईकांकडे जाऊन साप चावल्याची माहिती दिली. तेथे साप मेल्याचे नातेवाइकांनी पाहिले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी मुलाला तात्काळ सदर रुग्णालयात नेले. जिथे मुलावर डॉक्टरांनी उपचार केले. या सापाला कोणीही मारले नसल्याचे मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले. मुलाला चावल्यानंतर काही मिनिटांतच साप मरण पावला. कुटुंबीयांनी त्या सापाला सोबत घेऊन सदर हॉस्पिटल गाठले. जे पाहण्यासाठी रुग्णालयात गर्दी झाली होती. सर्पदंशाच्या या घटनेची माहिती ज्या कोणालाही मिळत आहे त्यांचा या घटनेवर विश्वास बसत नाही. या सापाचा मृत्यू कसा झाला, याची संपूर्ण परिसरात चर्चा सुरु आहे.