मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जम्मू-काश्मीरमध्ये पहिली बर्फवृष्टी

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी आज झाली. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. बर्फवृष्टीचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह असून बर्फात खेळण्याचा ते आनंद ते लूटत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्गही काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. tr शिमला येथे देखील बर्फवृष्टीला सुरुवात झाली असून येथील खारापठार भाग मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे निसर्गसौंदर्याने नटला आहे.

दरम्यान, खराब हवामानामुळे येथील त्रिकुला टेकड्या, तसेच वैष्णोदेवी गुंफा येथे भाविकांसाठी पुरवण्यात येणारी हेलिकॉप्टर सेवा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. 
 
भारताच्या उत्तरेकडील भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने राजधानी दिल्लीतही त्याचा परिणाम जाणवत आहेत.  शीत लहरींमुळे उर्वरित भारतात येत्या दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.