बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (15:39 IST)

‘मी निवृत्त होणार आहे' : सोनिया गांधी

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सोनिया यांना आता तुमची काय भूमिका असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सोनिया गांधींनी मिश्किलपणे (हसत-हसत) ‘मी निवृत्त होणार आहे.’ असं वक्तव्य केलं. असं असलं तरीही त्यांनी आपल्या निवृत्तीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे. दरम्यान, सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार नसल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. ‘सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष पदावरुन पायउतार होणार आहेत. राजकारणातून निवृत्त नाही.’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहं.