1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहदाबाद , बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (11:10 IST)

लोहपुरुषाच्या जगातील उंच पुतळ्याचे अनावरण व त्याची ऑनलाइन तिकिट विक्री सुरू

भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखल जाणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल यच्या 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे अनावरण आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 
 
स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जाणारा हा जगातील सर्वांत उंच पुतळा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर लगेचच भारतीय हवाई दलाचीतीन विमाने पांढरा, केसरी आणि हिरवा या तीन रंगांची बरसात करत अवकाशात झेपावणार असून तिरंगी ध्वजाची प्रतिकृती तयार करणार आहेत. या पुतळच्या जवळच उभारण्यात आलेल्या वॉल ऑफ युनिटीचे उद्‌घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. यावेळी भारताची तीन जग्वॉर लढाऊ विमाने हवेत झेपावून कसरत करणार आहेत.  
 
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांचा”स्टॅच्यू ऑफ युनिटी” पुतळा पाहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. सरदार सरोवर धरणासमोर साधू बेट नावाच्या एका बेटावर निर्माण करण्यात असलेला “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जगातील सर्वात उंच पुतळा बनला आहे. 31 ऑक्‍टोबर रोजी पंतप्रधान नरंद्र मोदी त्याचे लोकार्पण करणार आहेत.
 
स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाथी 350/- रुपये तिकिट ठेवण्यात आले आहे. 31 ऑक्‍टोबर रोजी लोकार्पण झाल्यानंतर 1 नोव्हेंबरपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वसामान्य जनतेला पाहण्याठी खुली करण्यात येणार आहे. पुतळ्यासमोर पुतळा पाहण्यासाठी एक गॅलरी उभारण्यात आली आहे. त्यात बसून सुमारे 200 प्रेक्षक पुतळा पाहू शकतील.
 
सुमारे 182 मीटर्स उंच असलेली स्टैच्यू ऑफ यूनिटी जगातील सर्वात उंच पुतळा आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (93 मीटर्स)च्या तो जवळपास दुप्पट उंच आहे. बुकिंगसाठी लवकरच सरदार पटेल ऍप लॉच येणार आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
 
पुतळ्याचे एकुण वजन 1700 टन असून उंची 522 फूट आहे.
 
पायांची उंची 80, हातांची 70 तर चेहऱ्याची उंची 70 फूट आहे.
 
जगविख्यात मूर्तीकार राम व्हि सूतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा करण्यात आला आहे.
 
केवळ 33 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हा पुतळा तयार करण्यात आला असल्याचा दावा तो तयार करणाऱ्या एल अँड टी कंपनीने केला आहे.
 
नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापासून 3.5 किमी अंतरावर हा पुतळा उभारण्यात आला असून नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्याची कोनशीला ठेवण्यात आली होती.
 
भारतीय जनता पार्टीने पुतळ्यासाठी देशभरात लोह गोळा करण्याचे अभियानही राबवले होते. पुतळ्याच्या उभारणीसाठी एकुण 2989 कोटी रूपये खर्च करण्यात आला असून विरोधी पक्ष त्यावर टीकाही करत आहेत. आजच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना गुजरात सरकारने आमंत्रण दिले आहे.