सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 डिसेंबर 2018 (09:14 IST)

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची आत्महत्या

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. इंजिनीअरिंग चांगले नसून त्यात नोकऱ्या नाहीत, तू शिक्षण घेऊ नकोस, अशा स्वरूपाच्या प्राध्यापकाच्या टिप्पणीला कंटाळून  ही आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटनुसार, पवई पोलिसांनी प्राध्यापक पी. विजयकुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
संकेत हा पवईच्या रामबाग इमारतीत कुटुंबीयांसोबत राहायचा. त्याची आई डॉक्टर तर वडील दंडाधिकारी आहेत. २०१५ मध्ये इंजिनीअरिंग पूर्ण करून त्याने एलएलबीचा अभ्यास सुरू केला. जून महिन्यात त्याने टिसमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. याच दरम्यान प्राध्यापक विजयकुमार त्याला त्रास देत असल्याचे त्याने पालकांना सांगितले. यामुळे मुलगा तणावात असल्याने त्यांनी त्याच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून उपचारही सुरू केले होते.