शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (18:14 IST)

मणिपूरात पुन्हा हिंसाचार; विद्यार्थ्यांची सुरक्षा दलांशी चकमक, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या; 5 दिवस इंटरनेट बंद

मणिपूरात राजभवनाकडे कूच करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विद्यार्थी आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलक मणिपूर सरकारच्या डीजीपी आणि सुरक्षा सल्लागारांना हटवण्याची मागणी करत आहेत. तत्पूर्वी, सोमवारपासून खवैरामबंद महिला बाजारात तळ ठोकून बसलेल्या शेकडो विद्यार्थिनींनी बीटी रोडच्या बाजूने राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सुरक्षा दलांनी काँग्रेस भवनाजवळ रोखले.
 
मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढून केंद्रीय गृहमंत्री अमितशाहचा पुतळ्याचे दहन केले. सध्या इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून  BNSS च्या कलम 163 (2) अंतर्गत थौबलमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
Edited by - Priya Dixit