testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुब्रतो रॉय यांना दिलासा , अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

Last Modified शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (23:03 IST)

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सेबी कोर्टानं दिलासा देत रॉय हे नियमित सुनावणीला उपस्थित राहत असल्यानं सेबी कोर्टाने यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केलं आहे. रॉय यांच्यावरील आरोप निश्चित प्रकरणावरही 18 मे रोजी सुनावणी होणार आहे, असं कोर्टानं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं 300 कोटी रुपये भरण्यात अपयशी ठरल्याने सहाराच्या पुणे येथील अ‍ॅम्बी व्हॅलीतील मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. सहारा समूह गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला होता.यावर अधिक वाचा :