testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुपरमूनचा अनोखा नजारा 14 नोव्हेंबरला ‍दिसणार

येत्या 14 नोव्हेंबरला म्हणजे कार्तिकी पौर्णिमेदिवशी ऐतिहासिक खगोलीय घटना बघण्यास विसरू नका. या दिवशी 2016 सालातला सर्वात मोठा चंद्र म्हणजेच सुपरमून पाहता येणार आहे.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात निकट येणार असून तो नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा 14 टक्के मोठा ‍व 30 टक्के अधिक तेजस्वी दिसेल. वर्षातल्या सर्वच पोर्णिमांना चंद्र पृथ्वीजवळ येत असतो मात्र त्याच्या अंतरात फरक असतो व त्यामुळे त्याचे तेज व आकाराही भिन्न असतात. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच चंद्र 14 नोव्हेंबरला पृथ्वच्या सर्वात जवळ अंतरावर येणार आहे.
यापूर्वी इतक्या निकट तो 1948 साली दिसला होता. हा योग या नंतर 18 वर्षांनी पुन्हा म्हणजे 25 नोव्हेंबर 2034 ला येईल. तेव्हा त्याला सुपरमून असे म्हणले जाते.


यावर अधिक वाचा :