1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (12:50 IST)

सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांचा अंतरिम जामीन फेटाळला, 23 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

supreme court
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआय प्रकरणात दाखल केलेल्या अंतरिम याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणात त्यांना जमीन देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली आता या प्रकरणात नियमित जामिनावर सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. 

केजरीवालांनी जामीन आणि अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या जामीन अर्जावर सुनावणी आता 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. सीबीआयला 23 ऑगस्ट पर्यंत उत्तर द्यायचे आहे. केजरीवाल यांच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी केजरीवालांच्या अस्वस्थतेमुळे कारणास्तव अंतरिम जामिनाची याचिका दाखल केली होती त्याला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ईडीच्या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे, मात्र उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वतः अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
 
Edited by - Priya Dixit