testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘ताज मानसिंग’ हॉटेलच्या ई-लिलावाला सुप्रीम कोर्टानेदिली परवानगी

suprem court
Last Modified गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:21 IST)

दिल्लीतील मानसिंग मार्गावरील 11 मजली पंचतारांकित ‘ताज मानसिंग’ हॉटेलच्या ई-लिलावाला सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे.

तर कोर्टाने आदेश देत असे सांगितले आहे की लिलाव झाला नाही तर त्यांना हॉटेल रिकामं करण्यासाठी टाटाना सहा महिन्यांचा कालवधी दिला जावा.

एनडीएमसीने ‘ताज मानसिंग’च्या ई-लिलावाबाबत सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली होती.

सुप्रीम कोर्टाने टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडला (IHCL) सांगितलं आहे की, जर तुम्हाला यसंदर्भात काहीही आक्षेप असेल, तर एका आठवड्यात उत्तर दाखल करायला सांगितले आहे.

काय आहे प्रकरण -

टाटा ग्रुपचं ‘ताज मानसिंग’ हे हॉटेल 1976 मध्ये आयएचसीएलला 33 वर्षांसाठी लीजवर दिले होते. मूळ संपत्ती ही एनडीएमसीच्या मालकीची आहे. मात्र,
2011 मध्ये लीज संपल्यानंतरही टाटा ग्रुपने वेगवेगळ्या आधारावर लीजचा विस्तार करुन व्यावसाय सुरु ठेवला होता.यावर अधिक वाचा :