Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

तुमच्या पेक्षा तर सुरेश प्रभू चांगले होते


माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रेल्वे समस्या ट्विट करायचे आणि लोकांना लगेच ते प्रतिक्रिया द्यायचे. मात्र आता चित्र बदल आहे. नागपूर येथून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबियांना रेल्वे मंत्र्यांना 45 ट्विट केले पण पियुष गोयल आणि त्यांच्या मंत्रालयाकडून कोणतीच मदत आली नाही. त्यानंतर या प्रवाशांने ट्विट करत म्हटलं की, तुमच्या पेक्षा तर सुरेश प्रभू चांगले होते जे प्रत्येक वेळेस मदतीसाठी तयार असायचे.
मोहन फकीरचंद हे पत्नी ज्योती आणि मुलासह नागपूर येथून कोटाला निघाले होते. त्यांचं तिकीट कन्फर्म नाही झालं. त्यांना रॅक बर्थ मिळाला पण तेथे आधीच काही लोकं बसले होते. त्यांना त्या जागेवर त्या व्यक्तीने बसू नाही दिलं आणि संपूर्ण प्रवास त्रास दिला. अनेक तास ते रेल्वेमध्ये टीसीला शोधत होते. पण त्यांना ते नाही मिळाले. त्यानंतर राग व्यक्त करत त्यांनी गोयल यांना म्हटलं की, तुमच्या पेक्षा प्रभू यांचं मॅनेजमेंट चांगलं होतं. जर ते आज मंत्री असते तर माझी समस्या सोडवली असती.


यावर अधिक वाचा :