बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (17:37 IST)

'त्या' पाकिस्तानी महिलेला मेडिकल व्हिसा

अनेक दिवसांपासून भारतात उपचारासाठी येण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानी कॅन्सर पीडित महिलेला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. फैजा तनवीर या पाकिस्तानी महिलेचे नाव आहे. तिने सुषमा स्वराज यांना ट्विट करत तुम्ही माझ्या आईसारख्या असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत पुन्हा एकदा आपल्याला व्हिसा मिळवून देण्यासाठी विनंती केली. सुषमा स्वराज यांनी तात्काळ ट्विटची दखल घेत शुभेच्छा स्विकारल्या आणि व्हिसा देत असल्याचं जाहीर केलं.

तोंडाचा कॅन्सर असलेल्या पीडित फैजा यांनी रविवारी सुषमा स्वराज यांचा उल्लेख करत ट्विट केलं होतं. 'मॅडम तुम्ही माझ्यासाठी आईच आहात, कृपया मला मेडिकल व्हिसा द्या. 70 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आनंदात कृपया माझी मदत करा', असं ट्विट फैजा यांनी केलं होतं.यानंतर रात्री 11 वाजताच्या आसपास सुषमा स्वराज यांनी ट्विटला उत्तर देत मेडिकल व्हिसा देत असल्याचं सांगितलं.