testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाकव्याप्त काश्मीरमधील तरुणाला भारताचा व्हिसा

Last Modified मंगळवार, 18 जुलै 2017 (17:09 IST)
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 24 वर्षीय तरुणाला व्हिसा देत असल्याचं जाहीर केलं आहे. सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे की, यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांच्या पत्राची काहीही गरज नाही. पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचा एक अविभाज्य घटक असून, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे तिथे कब्जा केला आहे असंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नागरिकाला व्हिसा देत सुषमा स्वराज यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं असून, त्याचवेळी पाकिस्तानला आरसा दाखवण्याचं काम केलं असल्याचं बोललं जात आहे.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये राहणारा 24 वर्षीय ओसामा अली याला उपचारासाठी भारतात यायचं आहे. मात्र त्याला पाकिस्तानकडून कोणतीही परवानगी दिली जात नव्ही. ओसामाच्या यकृतामध्ये गाठ असून उपचारासाठी त्याला दिल्लीला यायचं आहे. यासाठी नियमांचं पालन करत प्रक्रियेप्रमाणे त्याला सरताज अजीज यांना पत्र लिहायचं होतं, आणि ते पत्र भारतीय दुतावासामध्ये द्यायचं होतं. पण त्याने असं काही केलं नाही, त्यामुळे व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण होत होती. अशावेळी सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेत ओसामाला मदत केली. त्यांनी ओसामाला कोणत्याही पत्राविना उपचारासाठी मेडिकल व्हिसा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.


यावर अधिक वाचा :