testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अनोखी ‘सेल्फी विथ काऊ’ स्पर्धा

Last Modified सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (10:39 IST)

कोलकातामध्ये एका सामाजिक संस्थेने ‘सेल्फी विथ काऊ’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्ट्या गोरक्षण आणि गायीचे महत्त्व याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.

गो सेवा परिवार या सामाजिक संस्थेने ‘सेल्फी विथ काऊ’ आणि ‘काऊफी’ या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आतापर्यंत या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरक्षण हा मुद्दा धर्म आणि राजकारणाशी जोडता कामा नये. सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे. गोमूत्र, दूध आणि शेण आदींपासून वैज्ञानिक सिद्धता दर्शवणारे अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत, असे संस्थेचे पदाधिकारी अभिषेक प्रताप सिंह यांनी सांगितले. या स्पर्धांमुळे लोकांमध्ये गायीचे महत्त्व आणि गोरक्षण याबाबत जागृती होईल, असेही ते म्हणाले. याआधीही या संस्थेने अशा प्रकारची मोहीम राबवली आहे.यावर अधिक वाचा :