Widgets Magazine

घोर कलयुग मोबाईल हरवला बापाने दिला नरबळी

Last Modified गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (17:32 IST)
आपला मोबाईल हरवला तो परत मिळावा या करिता एका क्रूर पित्याने अंधश्रध्येने स्वतःच्या पोटच्या अवघ्या ४ वर्षाच्या मुलीचा
बळी दिला आहे. यामध्ये एका मांत्रिकाने त्याला संगितले की तुझ्यावर कोप झाला आहे. त्यामुळे
देवाला खूश करणे गरजेचे असून यासाठी नरबळी देण्याची गरज आहे.

एका इंग्रजी राष्ट्रीय वृत्तपत्राने हे वृत्त प्रसारित केले आहे. यानुसार आसाममधील रतनपूर येथे आदिवासी भागात हनुमान भूमजी यांच्या मुलीने काही दिवसांपूर्वी मोबाईल हरवला . त्यामुळे
फोन परत मिळावा यासाठी भूमजी यांचे प्रयत्न सुरु होते. यावेळी त्यांचा मित्र आरिफ उद्दीन अलीच्या माध्यमातून गब्बर सिंह नामक मांत्रिकापर्यंत पोहोचले. मोबाईल परत मिळण्यासाठी देवीदेवतांना खूश करणे गरजेचे आहे, यासाठी नरबळी देण्याची गरज आहे असे गब्बर सिंहने भूमजी यांना सांगितले होते. यानुसार भूमजीने आरिफ आणि त्याचा भाऊ जलाल उद्दीनच्या मदतीने गावातील चार वर्षाची मुलगी सूनू गोब्दाचे
अपहरण केले आणि तिची हत्या केली आहे.यामध्ये हे दोघे मित्र आणि पुजारी पळून गेले आहेत.पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून त्यांचा शोध घेत आहेत.


यावर अधिक वाचा :