शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (14:52 IST)

भीषण अपघात : एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

accident
तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरमजवळ गुरुवारी एक भीषण अपघात झाला. कार आणि लॉरी यांच्यात धडक झाली असून कारमधील एका मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक चेन्नईहून मायलादुथुराईला जात होते. तसेच गुरुवारी सकाळी एका लॉरीने त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेमुळे कारमधील पाचही जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर ट्रकचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली.
 
अपघात कसा झाला? 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरमजवळ गुरुवारी घडली. कारमधील पाच जण चेन्नईहून मायलादुथुराईला जात असताना त्यांची कार पी मुतलूर पुलावर आली तेव्हा समोरून येणाऱ्या एका लॉरी चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील पाचही जण जागीच ठार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकाचा शोध सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.