गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (21:02 IST)

पुंछमध्ये दहशतवाद्यांचा हवाई दलाच्या वाहनांवर हल्ला, पाच जवान जखमी

जम्मू काश्मीरच्या पुंछ मध्ये दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर गोळीबार केला या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले असून हल्ला केल्यावर दहशतवादी घटनास्थळावरुन पसार झाले. जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे . शाहसीतारजवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत. 

पूंछ मधील शशिधर भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दोन वाहनांवर गोळीबार केला. त्यातील एक वाहन हवाईदलाचे होते. हे वाहन सनई टोप कडे जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळतातच  लष्कर आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरु आहे. 
 
 
 Edited By- Priya Dixit