शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दि ल्ली , सोमवार, 3 डिसेंबर 2018 (11:26 IST)

महाआघाडीचा अजेंडा 10 डिसेंबर रोजीठरणार महाआघाडीचा अजेंडा

आगामी लोकसभा निवडणुकीला आता पाच महिन्यांचा कालावधी राहिला आहे. सध्याच्या मोदी सरकारला निवडणुकीत टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व पक्ष पुन्हा एकत्र येत आहेत. टीडीपीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे की, महाआघाडीचा अजेंडा ठरवण्यासाठी येत्या 10 डिसेंबर रोजी विरोधी पक्षातील प्रमुखांची बैठक होणार आहे. 
 
अपक्षांच्यावतीने पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी चर्चा करण्यात येणार आहे. देशातील राजकारणात अनेक अनुभवी नेते हे पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत. यावेळी त्यांनी मला पंतप्रधानपदामध्ये स्वारस्य नाही. अमरावती हे शहर मला माझ्या राज्याची राजधानी म्हणून मला विकसित करायचे आहे. माझ्या नव्या  
राज्याचा विकास करायचा आहे हे यानिमित्ताने त्यांनी स्पष्ट केले.
 
टीडीपी नेत्यांनी यावेळी आम्हाला फक्त निवडणुकीसाठी पंतप्रधान नको आहे. जे पंतप्रधान फक्त  निवडणुकीचा प्रचार करतात, असे पंतप्रधान आम्हाला नको आहेत. देशात नवे बदल आणणारा आणि बदल घडवणारा पंतप्रधान आम्हाला हवा असे त्यांनी मध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 
 
मागील काही महिन्यांपासून नायडू भाजप विरोधी पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करीत आहेत. मागील काही दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्ष मायावती, सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, डीएकेचे ए. के. स्टालिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली आहे. 
 
येत्या 10 डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीसाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल (सेक्यूलर), बसपा, सपा, आप पक्षाचे वरिष्ठ नेते हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.