बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जून 2018 (08:58 IST)

दहशतवाद्यांकडून अपहरण केलेल्या जवानाची हत्या

जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असं या जवानाचं नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला. औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते. औरंगजेब हे 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून त्यांची पोस्टिंग 44RR शादीमार्गमध्ये होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतताना, दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य आहेत.
 
औरंगजेब सकाळी नऊच्या सुमारास एका खासगी वाहनातून शोपियांच्या दिशेने येत होते. त्यावेळी कलमपोराजवळ अतिरेक्यांनी वाहन अडवलं आणि त्यांचं अपहरण केल होत.