शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (16:37 IST)

केंद्र सरकार आता रद्द करणार 10 लाख रेशन कार्ड, या लोकांना मोफत धान्य मिळणार नाही

Ration
देशभरातील कोट्यवधी लोक मोफत सरकारी रेशनचा लाभ घेत आहेत पण आता सरकार अशा लोकांचे रेशन बंद करणार आहे. जे सरकारी रेशनचा खोट्या मार्गाने फायदा घेत आहेत .सरकार ने तब्बल 10 लाख बनावटी रेशनकार्डाचा शोध घेत त्यांना रद्द करून रेशनवर बंदी घातली आहे. 
 
सध्या देशभरात 80 कोटीहून अधिक लोक मोफत रेशनकार्डाचा लाभ घेत आहे. त्यात अपात्र असलेले देखील बनावट शिधा पत्रिका बनवून मोफत रेशनच्या सुविधांचा लाभ घेत आहे. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख अपात्र आणि बनावट रेशनकार्ड शोधून काढले आहे. जे मोफत गहू, हरभरा, तांदूळ घेत आहे.   
 
केंद्र सरकार ने शिधा वाटप विक्रेत्यांना अपात्र रेशनकार्ड धारकांची यादी पाठवण्याचे आदेश दिले आहे. अपात्र रेशनकार्डावर विक्रेते चिन्ह अंकित करून अहवाल जिल्हामुख्यालय कार्यालयात पाठवतील. त्यानंतर त्यांचे रेशनकार्ड रद्द केले जातील.त्यांना मोफत रेशन सुविधा मिळणार नाही. 
Edited by - Priya Dixit