शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 एप्रिल 2024 (16:23 IST)

बंगालच्या मुख्यमंत्री पुन्हा एकदा जखमी झाल्या,हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना पाय घसरला

Lok sabha polls
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा जखमी झाल्या आहेत. दुर्गापूर येथे हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरला. त्यांना सध्या आसनसोल येथे नेण्यात आले आहे. या घटनेशी संबंधित एका व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला आणि त्यां खाली पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी त्यांना उचलण्यासाठी धावले. पडल्याने ममता यांना किरकोळ दुखापत झाली आहे. 
 
ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ममता अनेकदा जखमी झाल्या आहे. नुकतीच ममता त्यांच्या राहत्या घरी जखमी  झाल्या होत्या. कॅम्पसमध्ये चालत असताना त्यांच्या पायाला ठेच लागून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे त्यांना टाकेही देण्यात आले. 
 
Edited By- Priya Dixit