शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (10:13 IST)

अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होणार

मान्सून आता देशात पोहचत असून त्यामुळे आता काही दिवसात पाऊस दाखल होणार आहे. देसाच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर राहील. चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, मात्र त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार आहे. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला असणार आहे. सोबतच किनारपट्टीजवळील समुद्र काही प्रमाणात खवळलेला असणार आहे. राज्यातील कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मत हवामान तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी मासेमारांनी 11 आणि 12 जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.सोबतच कोकणातील रायगडसह  किनार पट्टीवर पुढील 48 तासात 30-40 किमी वेगाने विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार आहेत.