शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (08:42 IST)

बाबरी मशीद जमीन वाद खटल्याची सुनावणी २६ फेब्रुवारीला

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद खटल्याची सुनावणी २६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. याआधी पुर्नघटीत करण्यात आलेल्या पाच सदस्यीय घटनापीठामधील न्यायमूर्ती शरद बोबडे उपलब्ध नसल्याने २९ जानेवारीला होणारी सुनावणी पुढे ढकलली होती. आता न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायालयीन कामकाजात रुजू झाल्याने अयोध्या खटल्याची सुनावणी २६ फेब्रुवारीला होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला.
 
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादावर सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची पुर्नरचना केली आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती अशोक भुषण, आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर यांचा समावेश केला आहे. या दोघांसह शरद बोबडे, एन. व्ही. रमण आणि धनंजय चंद्रचूड यांचाही घटनापीठात समावेश आहे.