बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2024 (10:13 IST)

पतीने Instagram चालवण्यापासून थांबवले तर दोन मुलांच्या आईने स्वतःचे जीवन संपवले

suicide
नोएडा मधून एक बातमी समोर अली आहे. जिथे एक महिलेने घरात पंख्याला स्वतःला लटकवून घेत आत्महत्या केली आहे. सांगितले जाते आहे की, या महिलेला तिच्या पतीने Instagram चालवू नकोस असे सांगितले होते. ज्यामुळे ती नाराज होती. दोघांमध्ये खूप भांडण देखील झाले होते. यामुळे महिलेने फाशी लावून घेतली. 
 
पोलिसांना या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. या परकरणाबद्दल पोलिसांनी सांगितले की,  या महिलेला दोन मुले आहे. सोमवारी या महिलेले स्वतःला संपविले. Instagram चालवू नको म्हणून असे या महिलेच्या पतीने तिला सांगितले पण तिच्या डोक्यात राग होता. यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तसेच पोलिसांनी सांगितले की, या महिलेच्या विवाहाला नऊ वर्ष झाले होते व यांना दोन मुले होती. Instagram चालवण्याचा या महिलेलला शोक होता व त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचललेले असे सांगण्यात आले आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहे.