1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (09:48 IST)

स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे सर्वाधिक कमाई करणारं स्मारक

गु गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे देशातील सर्वाधिक कमाई करणारं स्मारक ठरलं आहे. एका वर्षात २४ लाख पर्यटकांनी या स्मारकाला भेट दिली असून ६३ कोटी रुपयांची कमाई या स्मारकाने केली आहे.  जगातील सर्वाधिक उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
 
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा बनवण्यासाठी २९८९ रुपये खर्च करण्यात आले होते. लार्सन अँड टुब्रो कंपनीने हा पुतळा बनवला होता. सरदार सरोवर धरणापासून ३.२ किलोमीटरवर साधू बेटावर हा पुतळा बनवण्य़ात आला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी ३ हजार हून अधिक मजूर आणि २५० हून अधिक इंजिनियर्स झटत होते.
 
स्टॅच्यू ऑफ युनिटीनंतर ताजमहल, आग्र्याचा किल्ला, कुतुब मिनार, फतेहपूर सीकरी आणि दिल्लीचा लाल किल्ला यांचा नंबर लागतो. मागच्या वर्षी ताजमहलने ५६.८३ कोटींची कमाई केली होती.