शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (10:24 IST)

या महिला महापौरांना आली दाऊदची धमकी

गुंड, देहासद्रोही व आतंकवादी असलेला दाऊद आपल्या देशातून कधीच पळून गेला आहे. मात्र त्याचा नावाचा वापर अजूनही अनेक नामचीन गुंड करतात आणि सामान्य माणसाला धमकी देतात. असाच प्रकार ठाणे येथे घडला आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना ठाण्याच्या महिला महापौर मिनाक्षी शिंदे यांना धमकीचा फोन आला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांच्या नावे हे फोन आले आहेत. या फोनद्वारे शिंदे यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन नुसार तुम्हाला कुटुंबात राहायचे आहे ना, तर व्यवस्थित राहा, ठाण्यात कोणाशीही पंगा घेऊ नका अशा पद्धतीने धमकावण्यात आले आहे. याबाबत मिनाक्षी शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महापौर शिंदे यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता, त्यांनी हा फोन उचलल्यानंतर तुम्ही मिनाक्षी शिंदे बोलता का असे विचारले. त्यावेळी मिनाक्षी यांनी हो, तुमचे काम काय असा प्रश्न विचारला. त्यानंतर फोन केलेल्या व्यक्तीने मी डोंगरीवरुन दाऊदचा माणूस बोलतो आहे असे सांगित  त्यांना म्हणाला की तुम्ही ठाण्यात खूप भांडणं करता. व्यवस्थित राहत नाही. यापुढे जर तुम्ही नीट राहिला नाहीत. तर तुम्हाला उचलून नेऊ, तुमच्या कुटुंबियांना त्रास देऊ अशी धमकी दिली. त्याशिवाय या पुढे नीट राहायचे अशी दमदाटीही या गुंडांकडून महापौरांना करण्यात आली. पोलिसांनी या गंभीर घटनेची लगेच नोंद घेतली असून, तपास सुरु केला आहे.