सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (10:07 IST)

आजपासून नियमांमध्ये 5 मोठे बदल झाले,काय आहेत नियम जाणून घ्या

सप्टेंबर महिना आजपासून सुरू झाला आहे.आपल्या जीवनाशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत, जे आपल्या खिशावर देखील परिणाम करतील.1 सप्टेंबरपासून कोणते नियम बदलले आहेत ते जाणून घेऊ या.
 
1 ईपीएफ-आधार लिंक आवश्यक-आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून,जर आपले युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन)आपल्या आधार कार्डाशी जोडलेले नसेल,तर आपला  नियोक्ता आपल्या भविष्य निधी खात्यात पैसे जमा करू शकणार नाही.जर आपण  पीएफ खात्याशी आधार कार्ड लिंक केले नाही तर 1 सप्टेंबरपासून आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. हे दोन्ही लिंक करण्याची तारीख या आधीच 2 वेळा वाढवली होती.
 
2 जीएसटी रिटर्न्सवर 1 सप्टेंबर पासून नवे नियम-जीएसटी कलेक्शन मध्ये झालेली घट पाहता,सरकारने उशिरा कर जमा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे.आता सरकारने म्हटले आहे की जीएसटी भरण्यास विलंब झाल्यास 1 सप्टेंबर पासून नेट करावर व्याज आकारले जाईल.सरकारने म्हटले आहे की वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरण्यास विलंब झाल्यास 1 सप्टेंबरपासून एकूण कर दायित्वावर व्याज आकारले जाईल.
 
3 चेक क्लियरिंग सिस्टम- 1 सप्टेंबर पासून 50,000 रुपयांपेक्षा जास्तीचे चेक जारी केल्यास आपण अडचणीत येऊ शकता.बँकांनी आता पॉजिटीव्ह पे सिस्टम(PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे.बहुतांश बँक 1 सप्टेंबर पासून PPS लागू करणार आहे.
 
4 कार विम्याचे नियम- मद्रास उच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरपासून निर्णय दिला आहे की, जेव्हाही नवीन वाहन विकले जाईल तेव्हा त्याचा बंपर ते बंपर विमा अनिवार्य असावा.हा विमा 5 वर्षांच्या कालावधीसाठी वाहनचालक,प्रवासी आणि वाहनाचे मालक यांच्या विम्या व्यतिरिक्त असेल.बंपर ते बंपर विमा वाहनाचे ते भाग देखील कव्हर करेल जे सहसा विमा कंपन्यांनी कव्हर केलेले नाहीत.
 
5. डिस्ने + हॉटस्टारची प्लॅन महाग होईल- ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारची सदस्यता देखील 1 सप्टेंबरपासून महाग होईल.युजर्सला बेस प्लॅनसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये द्यावे लागतील. 2 फोनमध्ये अॅप चालवण्यासाठी वापरकर्त्यांना 899 रुपये द्यावे लागतील.