शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तिरुपती मंदिर सहा दिवसासाठी बंद

तिरुमाला येथील भगवान वेंकटेश्वराचे जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर सहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या 11 ते 16 ऑगस्ट या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाईल. 
 
उल्लेखनीय आहे की तिरुपती मंदिरात महासंप्रोक्षम अनुष्ठान विधी होणार असून हे 12 वर्षांतून एकदा होते. या दरम्यान दर्शनासाठी कमी वेळ मिळतो परंतू भाविकांची गर्दी अधिक असते. या काळात पाच लाखाहून अधिक भाविक येण्याचा अंदाज बांधला गेला असून त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विधी दरम्यान सहा दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.