1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. tolenaka

टोलमाफीला येत्या १८ नोव्हेंबर रात्री १२ पर्यंतची मुदतवाढ

लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोलमाफीची मुदत वाढविण्यात आली आहे. येत्या १८ नोव्हेंबरच्या रात्री १२ पर्यंत राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोलमाफी देण्याची घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यापूर्वी ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ पर्यंत टोल माफी होती. ती सोमवारी रात्री म्हणजेच १४ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर आज पुन्हा ही माफी ४ दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. 
पुढील लेख
अमेरिकेत मंगळवारीच का होते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक?