मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 एप्रिल 2020 (21:43 IST)

दहशतवादी हल्ला, CRPF चे दोन जवान शहीद

two CRPF jawans killed in terrorist attack
जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात शनिवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चौकीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. 
 
प्राथमिक माहितीनुसार, येथील नूरबाग परिसरात असणाऱ्या CRPF आणि स्थानिक पोलिसांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. अचानकपणे गोळीबार सुरु झाल्याने दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी एसडीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी नूरबाग परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे.