गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (17:34 IST)

तर टोकाची भूमिका घेतली जाईल - उद्धव ठाकरे

नोट बंदी  शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. शिवसेना रोज या निर्णयाचे कोणत्या न कोणत्या मार्गाने विरोध करत असल्याचे समोर येत आहे. तर सत्तेत असून सुद्धा दिल्लीत आणि राज्यात हवी ती किमत मिळत नाही त्यामुळे शिवसेना सध्या रागात आहे. त्यात आज नोटाबंदीवरुन निर्माण झालेली परिस्थिती लवकर बदलली पाहिजे. टोकाची भूमिका घेण्याची वेळ आणू नका असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. बाळासाहेबांबद्दल मोदींच्या मनात आदर आहे. परंतु सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं, देशाचे पंतप्रधान म्हणून आधी त्यांच्याकडून अपेक्षित आहेत असे उद्धव म्हणाले आहेत. तर सामना या मुख पत्रातून सुद्धा मोदी यांनी केलेल्या नोट बंदी वर जोरदार टीका केली आहे.