शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (16:41 IST)

ब्रेड घशात अडकून बॉडी बिल्डरचा दुर्देवी मृत्यू

आरोग्य तज्ञ लोकांना घाईत अन्न खाण्यास मनाई करतात. ते म्हणतात की जेवताना कधीकधी घशात अन्न पदार्थ अडकतात. यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू होतो.ब्रेड हे खाऊन एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो हे धक्कादायकच आहे पण ब्रेड खाऊन एका बॉडी बिल्डरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . 
 
तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील वडलूर येथे एका बॉडीबिल्डरचा मृत्यू झाला. 21 वर्षीय एम हरिहरन राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण घेत होते. वर्कआऊट दरम्यान त्याने ब्रेक घेतला आणि खायला सुरुवात केली. पण ब्रेडचा तुकडा घशात अडकला. जीव गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला.
 
हरिहरन हा सेलम जिल्ह्यातील पेरिया कोल्लापट्टीचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. शरीरसौष्ठव चॅम्पियनशिपमध्ये 70 किलोपेक्षा कमी वजनाच्या गटात तो स्पर्धक होता. या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी विविध राज्यातील स्पर्धक कुड्डालोर येथे आले होते. ते सर्व एका मंडपात थांबले. रविवारी (26फेब्रुवारी) रात्री 8 वाजता हरिहरन कसरत करत होते. त्याने ब्रेक घेतला आणि ब्रेड खाल्ली. यावेळी ब्रेडचा मोठा तुकडा घशात अडकला. त्यांना श्वास घेता येत नव्हता आणि लवकरच ते बेशुद्ध झाले. तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Edited By - Priya Dixit