1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑगस्ट 2020 (08:27 IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त

union home minister
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून ते कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक माहिती समोर येत आहे. याबाबत स्वतः अमित शहा यांनी ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित शहा कोरोनाच्या आजाराने त्रस्त होते. कोरोनाशी लढा देऊन अखेर गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाले आहेत.
 
अमित शहा यांनी उपचार घेत असताना त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर आणि इतर आरोग्य सेवक-सेविकांच्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करत मेदांता हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना धन्यवाद म्हटले आहे.