testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रक्षाबंधनासाठी बहिणीला टॉयलेट गिफ्ट

लखनौ- घरात टॉयलेट नसल्यामुळे बहिणीला शौचासाठी उघड्यावर जावे लागते. त्यामुळे तिला त्रास होत असल्यामुळे एका मुलाने आपल्या बहिणीला टॉयलेट गिफ्ट दिले आहे. देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. या दिवशी आपल्या बहिणीला अनोखे गिफ्ट देण्याचा सर्वच भावांचा प्रयत्न असतो. यूपीमधील एका मुलाने आपल्या बहिणीला चक्क टॉयलेट गिफ्ट दिले आहे.

उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील रूद्रगढ नौसी गावातील एका मुलाने आपल्या बहिणीला हे गिफ्ट दिले कारण आपल्या घरात शौचालय नसल्यामुळे बहिणीला त्रास सहन करावा लागतो, आपण ते पाहू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. राखी शौचालय असे या टॉयलेटला नाव देण्यात आले असून त्याला फुग्यांनी सजवण्यातही आले आहे. बहिणीला टॉयलेट गिफ्ट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या कष्टाने आपण 15 हजारांची जमवाजमव केली. माझ्यासारख्या व्यक्तींसाठी ही खूप मोठी रक्कम आहे, असेही तो म्हणाला. दरम्यान, यूपीमध्ये अनेक भावांनी आपल्या बहिणीसाठी शौचालय बांधली आहेत.


यावर अधिक वाचा :