शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनौ , मंगळवार, 4 एप्रिल 2017 (22:49 IST)

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना १ लाखापर्यंत कर्जमाफी

उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजपा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांचे ३० हजार ७२९ कोटींचे कर्ज माफ होणार असून, बुडीत कर्ज धरून एकूण ३६ हजार ३५९ कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे, या कर्जमाफीचा लाभ उत्तर प्रदेशमधील ८६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. 
 
योगी आदित्यनाथ यांनी 19 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यनंतर 16 दिवसांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक बोलावली आहे. उत्तर प्रदेशात सुमारे २ कोटी १५ लाख शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करायची झाल्यास ६२ हजार कोटी अपेक्षित आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे ३६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.