मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: आग्रा , गुरूवार, 10 जून 2021 (11:20 IST)

यूपीच्या आग्रा येथे भीषण रस्ता अपघातात 4 ठार

उत्तरप्रदेशातील आग्रा येथील एटमादपूर भागातील राष्ट्रीय महामार्ग -२ वर गुरुवारी भीषण रस्ता अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या वेदनादायक दुर्घटनेत इतर 10 जण जखमी झाले आहेत, ज्यांना एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे.
 
रोडवेज बस भरधाव वेगात पार्क केलेल्या कॅन्टरमध्ये धडकल्याने हा अपघात झाला. ही टक्कर इतकी जोरदार होती की बसचे परखच्चे उडून गेले.
 
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बरीच प्रयत्न करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना बाहेर काढले. बसचालकाने डुलकी घेतल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस अपघाताच्या तपासात गुंतले आहेत.