गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2017 (11:32 IST)

'तो' 99.99 टक्के मिळाल्यानंतर संन्यास घेतोय

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या 17 वर्षाच्या वर्शील शाह या मुलाने  12 वी सायन्स विभागातून 99.99 टक्के मिळवून पास  झाला. मात्र तो करिअरचा विचार न करता तो संन्यास घेत आहे.  या यशासाठी वर्शीलने त्याच्या आई-वडिलांकडून बक्षीस मागण्याच्या जागी सन्यास घेण्याची परवानगी मागितली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्शीलच्या आई-वडिलांना त्याच्या या निर्णयाबद्दल काही पश्चाताप नाही तसंच संपूर्ण परिवार वर्शीलच्या दीक्षा समारंभाची तयारी करतो आहे. 8 जून रोजी सूरतमध्ये त्याचा दीक्षा समारंभा पार पडणार आहे. वर्शीलचे वडील जिगर शाह आयकर विभागात इंस्पेक्टर पदावर काम करत आहेत. 'वर्शीलचा परिवार आधीपासूनच अध्यात्मिक आहे. त्याची आई अती धार्मिक आहे म्हणूनच वर्शील आणि त्याच्या बहिणीला अध्यात्माची आवड असल्याचं, वर्शीलच्या वडिलांनी सांगितलं आहे.