शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

उप्र: रेल्वेचे 13 डब्बे रुळावरुन घसरले, ३ ठार, ८ जखमी

उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये ‘वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस’चे 13 डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
 
माणिकपूर आणि मुघलसराय रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात घडला. ही एक्स्प्रेस पाटणा जंक्शनवरुन गोव्याच्या मडगावला जात होती. एक्स्प्रेस सकाळी 4.18 वाजता चित्रकूटच्या माणिकपूर रेल्वे स्थानकाजवळ आली असता ती रुळावरुन घसरली.
 
रुळाला तडे गेल्याने हा रेल्वे घसरल्याचा प्राथमिक अंदाज उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी वर्तवला आहे. दरम्यान, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.