शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

वसुंधराराजे घेणार स्वराज यांची जागा

उत्तर प्रदेशसह इतर राज्यात मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास बसलेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार पावसाळी अधिवेशनच्या प्रारंभी पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळात बदल करू शकतात.
 
मोदी हे कॅबिनेटमध्ये बदल करणार याची सर्वांना अपेक्षा आहे. पण आता ती नावे समोर येत आहेत. त्यावरून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांची जागा घेऊ शकतात. गेल्या काही दिवसापासून स्वराज यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत.
 
विदेश मंत्रिपदामुळे सुषमा स्वराज यांना सातत्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी इतर नावांची चर्चा सुरू आहे.