शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (11:12 IST)

2जी स्पेक्ट्रम घोटाळा : ए. राजा, कनीमोळीसह सर्व आरोपी दोषमुक्त

काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याप्रकरणी माजी दुरसंचारमंत्री आणि डीएमकेचे नेते ए.राजा व डीएमकेच्या राज्यसभेतील सदस्य कनीमोळी यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. 2जी घोटाळ्यासंदर्भात पटियाळा हाऊस येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2जी घोटाळ्यासंदर्भात एकूण 3 खटले न्यायालयात सुरु असून त्यापैकी दोन सीबीआयद्वारे तर एक अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केला आहे. 
 
कनिमोळी आणि ए. राजासह निर्माता करिम मोलानी, उद्योजक शाहिद बलवा आणि अनेकांचे भवितव्य या निकालातून स्पष्ट होणार आहे. महालेखापरिक्षकांनी या घोटाळ्यात सरकारी तिजोरीचे १ लाख ७६ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे तेव्हा स्पष्ट केले असले तरी सीबीआयने मात्र या घोटाळ्यात केवळ ३० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना सीबीआयचे माजी संचालक ए. पी.सिंग म्हणाले, या घोटाळ्याचा तपास करताना आमच्यावर सर्व बाजूंनी आमच्यावर दबाव होता, तत्कालीन सरकारने या स्पेक्ट्रम वाटपात काहीच नुकसान झाले नाही ( झिरो लाँस) अशी भूमिका घेतली होती मात्र आमच्या गणनानुसार यात ३०, हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. सीबीआयला पिंजर्यातला पोपट म्हणणे योग्य नाही कारण याच काळात आम्ही इतर राजकीय नेत्यांवरील खटले व तपास यशस्वीरित्या पूर्ण केला होता.