1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गायीच्या पोटातून काढलं 52 किलो प्लास्टिक, ऑपरेशनचा खर्च केवळ 140 रुपये

चेन्नई- वेटरनरी अॅनिमल साइंस युनिव्हर्सिटीमध्ये एका गायीची सर्जरी करून तिच्या पोटातून 52 किलो प्लास्टिक काढलं गेलं. 
 
प्लास्टिकमुळे गायीला वेदना होत होत्या. त्यामुळे ती आपल्या पोटावर लाथा मारायची. पोटात प्लास्टिक असल्यामुळे तिच्या दुधाचे प्रमाण देखील कमी झाले होते. 
 
किमान पाच तास सुरू असलेल्या या सर्जरी दरम्यान गायीच्या हृद्याजवळून अनेक सुया देखील सापडल्या. या सर्जरीचा खर्च केवळ 140 असल्याचा दावा डॉक्टर्सने केला आहे. या सर्जरीमध्ये युनिर्व्हसिटीच्या पदव्युत्तर पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपला योगदान दिला. एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अशा प्रकाराच्या सर्जरीला सुमारे 35 हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगण्यात येतं.