उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्समध्ये दाखल,प्रकृती स्थिर
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अस्वस्थता आणि छातीत दुखण्याची तक्रार आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. 73 वर्षीय धनखर यांना गेल्या शनिवारी रात्री रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
रात्री उशिरा उपराष्ट्रपतींना अस्वस्थ वाटत होते आणि छातीत दुखत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रात्री उशिरा 2 वाजताच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. उपराष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे आणि त्यांना क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. डॉक्टरांचा एक गट त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.