testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शांततेसाठी अनोखा प्रयत्न

भारत आणि पाकिस्तान या
दोन्ही देशातल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांतता प्रस्थापित करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत सादर करत मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर पाक ग्रुपने ‘जन गण मन’ सादर करत साद दिली आहे.
दोन्ही देशांच्या सीमेवर राहणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ राम’ नावाच्या ग्रुपमधील तरुणांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत सादर केलं होतं. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘पाक सरजमीन’ सादर करण्यात आलं. त्यामुळे ‘व्हॉईस ऑफ राम’ बँडविरोधात विविध स्तरातून टीकेची झोड उठली होती.
पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी मात्र ‘जन-गण-मन’ सादर करुन अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं आहे. एकत्रित गायलेल्या या राष्ट्रगीतांना ‘शांतिगीत’ असं नाव देण्यात आलं आहे. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


यावर अधिक वाचा :